महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत उत्साहात संपन्न झाली. यावेळी झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांची नियामक मंडळाचे सचिव म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
या सचिवपदाचा कालावधी सन 2026 ते 2031 या पाच वर्षासाठी असणार आहे. या निवडीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. व्यंकटराव मायंदे, डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, डॉ. रामकृष्ण मुळे, श्री. सुदाम अडसूळ, श्री. अतुल मारणे उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था, पुणे (Institution of Maharashtra Agricultural Technologists - IMAT) ही एक नोंदणीकृत संस्था आहे, जी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कार्य करते. ही संस्था कृषी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी स्वतंत्रपणे कार्य करते. या संस्थेचे उद्दिष्ट कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि कृषी क्षेत्रातील लोकांच्या क्षमता विकसित करणे हा आहे. या संस्थेद्वारे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, प्रगत पद्धती व उपक्रम यांवर आधारित वेबसंवाद, कार्यशाळा आणि इतर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे हा आहे. डॉ. प्रशांत बोडके यांच्या या निवडीबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments