राहुरी
तुळापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरी प्रकरणात राहुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी निष्पन्न करून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर घटना दिनांक 23/06/2025 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजण्याची दरम्यान घडली असून एका विधी संघर्षित बालकाने देवीच्या मूर्तीवरील गळ्यातील सोन्याची मण्यांची पोत व नाकातील नथ असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या प्रकरणी दादासाहेब सोपान हारदे, सरपंच – तुळापूर, ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे सो. अहिल्यानगर.अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलुबरमे सो.श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब, श्रीरामपूर भाग श्रीरामपूर , पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामनाथ सानप, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे,सतीश कुराडे,अंकुश भोसले यांनी केलेली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामनाथ सानप हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments