राहुरी
, दि. 26 जुलै, 2025
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या पुणतांबा येथील शासकीय कृषि तंत्र विद्यालयात कॅम्पस मुलाखतीद्वारे अकरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. सातप्पा खरबडे आणि कृषि तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. कृषि तंत्र विद्यालय, पुणतांबा येथे नवभारत फर्टीलायझर्स अँड ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचे विभागीय प्रमुख श्री. जी. एस. राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलाखती घेतल्या. सदर मुलाखतीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. 30 विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतून या कंपनीने अकरा विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम कंपनीद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृषि तंत्र विद्यालय, पुणतांबा हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. येथे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतीमधील आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्यांचे ज्ञान मिळते. या कॅम्पस इंटरव्यूमध्ये शैलेश सोनवणे, ओम सिन्नरकर, अजिंक्य टाके, प्रशांत अभंग, सिद्धार्थ अनुभोले, दुर्गेश परहे, शरयू सोनवणे, वेदांत शिंदे, तन्मय कांबळे, प्रवीण खळेकर आणि महेश परे या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या मुलाखती आयोजन करण्यासाठी विद्यालयाचे कृषि सहाय्यक श्री. सोमनाथ लंघे, श्री. किशोर भाकरे, श्री. दिनेश पंडित त्याचप्रमाणे श्री. अंबादास इंगळे आणि श्री. सचिन राऊत यांचे सहकार्य लाभले. मुलाखती झाल्यानंतर कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खर्डे आणि कंपनीचे विभागीय प्रमुख श्री. जी. एस. राव यांच्या शुभहस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

Post a Comment
0 Comments