Type Here to Get Search Results !

लोटस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंटरनॅशनल जादूगार रियाचा अफलातून जादू शो ने विद्यार्थ्याची मने जिंकली.......


        लोटस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज असा क्षण उभा राहिला ज्याने विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवले. भारतातील सर्वाधिक प्रथम पुरस्कार मिळवलेली इंटरनॅशनल जादूगार रिया हिने तिच्या अप्रतिम जादू प्रयोगांनी संपूर्ण वातावरणाला वेगळाच रंग दिला.

          लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मंगल रावसाहेब बानकरहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते  तर शनीशिंगणापूर देवस्थान अध्यक्ष-भागवत बानकर,शनेश्वर हायस्कुल चे मुख्याध्यापक- लोढे सर प्रमुख

उपस्थितीत होते. प्राचार्या मंगल रावसाहेब बानकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले      प्रमुख पाहुणे मंचवरउपस्थितीत झाल्यावर रियाने आपल्या कलात्मक शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हातचलाखी, वेगवेगळे रहस्यमय प्रयोग, अचानक बदलणारे दृश्य आणि अचंबित करणारे प्रयोग पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

           


फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, रियाने “जादू ही फक्त खेळ नाही, तर कल्पनाशक्ती वाढवण्याचे आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन आहे” असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांनी विस्मयचकित होत जादूच्या प्रत्येक प्रयोगाचा आनंद घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल असे मत व्यक्त केले.

शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली होती. सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीने पार पडल्याने पालकांनी व उपस्थितांनी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

“अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये, कल्पनाशक्तीला चालना आणि जीवनात मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळते”, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments