Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना 18 हजार कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न पंतप्रधान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांचा योग्य सन्मान विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे


 दि. 19 नोव्हेंबर, 2025

         


  तामिळनाडू येथील कोइंबतूर येथे सुरू असलेल्या साउथ इंडिया नॅचरल फार्मिंग समिट 2025 या कार्यक्रमांमध्ये देशातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18000 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपन विद्यापीठात शेतकरी व शास्त्रज्ञांसाठी करण्यात आले. 

        याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले, कापूस सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. पवन कुलवाल, डॉ. उल्हास सुर्वे व डॉ. भाईदास देवरे उपस्थित होते. 

         याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असून पीएम किसानचा एकविसावा हप्ता आज मा.पंतप्रधानांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यामध्ये जवळजवळ नऊ कोटी शेतकऱ्यांना 18000 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. कैलास कांबळे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. उल्हास सुर्वे व डॉ.भाईदास देवरे यांनी नैसर्गिक शेती पध्दती, पॉलीटनेल ड्रायर, फुले सुपर बायोमिक्स, सेंद्रिय शेतीतील एकात्मिक पीक व्यवस्थापन व कृषी उत्पादनातील कीटकनाशक अवशेष व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी  मंडल कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब सोनवणे आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दुर्गेश पाटील यांनी महाविस्तार ए आय या ॲपबद्दल माहिती दिली. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ व सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख यांच्या हस्ते प्रकल्पातील तांभेरे व कानडगावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फुले सुपर बायोमिक्स व फुले मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड टू चे वाटप करण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments