Type Here to Get Search Results !

क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा

 क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय  क्रीडा स्पर्धा 2025-26 या मध्ये बॉल बॅडमिंटन या क्रीडा प्रकारामध्ये  राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल या  शाळेतील 14 वर्षीय वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.या विद्यार्थ्यांना  विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. दादासाहेब वाघ  यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.महानंद माने साहेब, खजिनदार श्री‌.महेश घाडगे साहेब व सर्व संचालक मंडळ सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.योगिता आठरे मॅडम, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर







कर्मचारी, सर्व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments