Type Here to Get Search Results !

विविध गुणदर्शन स्पर्धेत मुळानगर शाळेचे सुयश केंद्र सडे, तालुका राहुरी


राहुरी तालुकयातील मुळानगर जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश  मिळाल्याने ग्रामस्थांनी सर्वांचेअभिनंदन केले 



सडे केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा आज गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी वांबोरी स्टेशन येथे पार पडल्या .केंद्रातील 20 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता .आपल्या शाळेने ही या स्पर्धेत समूह गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला .

या स्पर्धेत आपली मुळानगर शाळा चमकली .सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत आपल्या शाळेने सादर केलेल्या शेतकरी गीताचा द्वितीय क्रमांक पटकावला . विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट गीत सादर केले . गीतामध्ये आरती अमृत साळुंके ,विद्या सर्जेराव माळी, रीना उदय वायसे ,यशस्वी विष्णू नवसारे, हर्षदा किशोर बर्डे, श्रावणी दीपक नवसारे, अनुष्का सागर गायकवाड, सारंग सागर गायकवाड ,श्रवण संतोष गाडे यांनी सहभाग घेतला होता.

वैयक्तिक स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत श्रवण संतोष गाडे याने द्वितीय क्रमांक मिळविला .त्याने मी नदी बोलते या विषयावर आपले विचार व्यक्त केले .

त्याचप्रमाणे गोष्ट कथा सादरीकरण या विषयात अतिशय उत्कृष्ट कथा सादर करून *श्रवण संतोष गाडे याने द्वितीय क्रमांक मिळविला 


Post a Comment

0 Comments