देवराज मन्तोडे ( वृत्तसेवा )
निमित्त आयोजित राज्यस्तरीय बसवंत चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि.२१/१२/२०२५ रोजी बसवंत मधमाशी उद्यान बसवंत -मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक या ठिकाणी स्पर्धेतील स्पर्धक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ अतिशय उत्साहाने पार पडला.
सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, म.फु.कृ.वि. राहुरी, शाळेची इयत्ता सातवी मध्ये शिकणारी आयेशा अस्लम मुलाणी हिस उत्तेजनार्थ पारितोषिक मा. श्री अंकुश शिंदे (IPS) पोलीस आयुक्त पुणे, यांचे हस्ते व नाशिकचे खासदार मा. श्री भास्कर भगरे सर, श्री. आदिनाथ चव्हाण, संपादक ॲग्रोवन पुणे., डॉक्टर बी. बी. पवार सर, श्री. संजय बी. पवार, संस्थापक बसवंत मधमाशी उद्यान प्रकल्प यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व रु.१०००/-अशा स्वरूपाचे पारितोषिक देण्यात आले.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ .विलास खर्चे सस्थेचे सचिव डॉ.महानंद माने साहेब, खजिनदार श्री.महेश घाडगे साहेब व सर्व संचालक मंडळ सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.योगिता आठरे मॅडम, बसवंत गार्डन हनी बी फेस्टिवल राज्यस्तरीय चित्रकला परीक्षा समन्वयक राजेंद्र भालेराव, शाळेचे कलाशिक्षक हरेश्वर साळवे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक वर्ग व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment
0 Comments