Type Here to Get Search Results !

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बिजोत्पादन प्रकल्प व बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस निरीक्षण समितीची भेट


देवराज मंतोडे( वृत्तसेवा




दि. 26 डिसेंबर, 2025


             भारतीय कृषी अनुसंधान परिषद समन्वित भारतीय बीज विज्ञान संस्था, उत्तर प्रदेश यांनी गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना व गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन प्रकल्प प्रक्षेत्रास भेट दिली. सदर समितीमध्ये अखिल भारतीय समन्वित बियाणे प्रकल्प, बियाणे संशोधन व तंत्रज्ञान विभाग, चंद्रशेखर आझाद, कृषि विश्व विद्यालय, कानपुर येथील डॉ. सी. एल. मौर्या समितीचे अध्यक्ष म्हणून तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद समन्वित भारतीय बीज विज्ञान संस्था, उत्तर प्रदेश येथील डॉ. अंजनी कुमार सिंग व क्षेत्रीय कृषि संशोधन केंद्र, दुर्गापुरा, राजस्थान येथील डॉ. आर. सी. मीना यांचा सदस्य म्हणून समावेश होता. या निरीक्षण समितीने बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर तसेच प्रयोग शाळेत घेण्यात आलेल्या प्रयोगांची पाहणी केली असता डॉ. दिपक गायकवाड यांनी बीज उत्पादन आणि प्रामाणिकीकरण, डॉ. अविनाश कर्जुले यांनी बियाणे शरीर क्रिया शास्त्र, डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी बियाणे रोग शास्त्र, डॉ. रश्मी भोगे यांनी बियाणे कीटक शास्त्र तर डॉ. कैलास गागरे यांनी बियाणे प्रक्रिया शास्त्र या विषयांच्या प्रयोगांची माहिती सांगितली. यावेळी निरीक्षण समितीने बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमाची पाहणी केली. 

       निरीक्षण समितीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची सदिच्छा भेट घेऊन बिजोत्पादन व बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेतील सुरू असलेल्या विविध प्रयोगांविषयी समाधान व्यक्त केले.   बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या दृकश्राव्य सभागृहात प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे), डॉ. नितीन दानवले यांनी बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना येथे घेण्यात येत असलेल्या संशोधन, विस्तार व बीज प्रमाणिकीकरण तसेच विद्यापीठामध्ये घेण्यात येत असलेल्या बीजोत्पादनाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात समितीतील सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष डॉ. सी. एल. मौर्या यांनी संशोधन प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ उत्तम प्रकारे संशोधनाचे काम करत असून संशोधन प्रयोग शास्त्रीय दृष्ट्या उत्तम प्रकारे घेत असल्याचे समाधान व्यक्त करून सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले यांनी मा. डॉ. विलास खर्चे, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. विठ्ठल शिर्के, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांवर असलेला विश्वास आणि खंबीर साथ यामुळेच बियाणे विभागाचे कार्य उत्तम सुरू आहे असे बोलून धन्यवाद व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. दिलीप ठाकरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments