Type Here to Get Search Results !

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीशी सामंजस्य करार

 

राहुरी 


महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत कृषि विद्यापीठाचा आणि मुंबई येथील एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रा.लि. या नामांकित संस्थेबरोबर कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार झाला. कृषि विद्यापीठाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे आणि एज्युस्पार्कच्या वतीने नाशिक येथील कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. एम.जी. शिंदे यांनी स्वाक्षर्या केल्या. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, डॉ. रवि आंधळे व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम उपस्थित होते. 

एज्युस्पार्क संस्था शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) सहयोगाने या संस्थेची राज्यभर कौशल्य विकास केंद्रे कार्यरत असून नाशिकमध्ये सातपूर येथे त्यांचे आत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पदवीका, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारीत शिक्षण व प्रशिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे. महाविद्यालयाच्या आंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्टुडंट रेडी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी पाठविणे सोपे होणार आहे. एज्युस्पार्कच्या कौशल्य विकास केेंद्राद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण राष्ट्रीय शैक्षणीक धोरण-2020 ला अनुसरुन असून याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लागणार आहे. एज्युस्पार्कच्या हॅन्डसॅ-ऑन-ट्रेनिंग आणि ऑन-द-जॉब पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष कामाचा अनुभव मिळेल. या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. या कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्वतः चा स्टार्टअप सुरु करणे शक्य होईल. हा करार म्हणजे कौशल्य विकास उद्योजकतेला चालना देणारा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments